सातारा : सोलापूरच्या करमाळामधील धनाजी जाधव या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर साताऱ्यातही एका शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून आत्महत्या केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात चिलारेवाडी इथल्या शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून आत्महत्या केलीय. सुभाष शिंगाडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. 


तीन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन करुन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारा दरम्यान सुभाष शिंगाडे यांचा मृत्यू झालाय. 
 
त्यांच्यावर तीन लाखांचे कर्ज होते. याच विवंचनेतून त्यांनी आपला जीवनप्रवास संपवलाय.