उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये आत्महत्या केलेल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्याच्या चिठ्ठीत ओमराजे निंबाळकर हे जवाबदार आहेत असे लिहील्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाला वसंतदादा नागरी सहकारी बँक जवाबदार असल्याचा आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. दरम्यान, शेतकऱ्याने केलेली आत्महत्या ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. मात्र या प्रकरणात माझा काहीही दोष नसल्याचा दावा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात सेनेने भाकरी फिरवत ओमराजे निंबाळकर यांना संधी दिली आहे. ही शिवसेनेची जागा आहे. तेव्हा विजय आपलाच असल्याचा दावा ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. दरम्यान, उस्मानाबाद मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केली आहे. ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक या दोघांनी चार एकर जमीनीचे फसवणुकीतून केलेले गहाणखत यामुळे कुटुंबाचे हाल झाले आहेत. या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत आहे, अशी सुसाईड नोट लिहून कसबे तडवळे गावातल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दिलीप ढवळे ५९ वर्षांचे होते. शेतातल्या झाडाला गळफास लावून घेतला. सुसाईड नोटमध्ये ढवळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यानावाचाही उल्लेख केला आहे.


दिलीप ढवळे यांचा मृतदेह झाडावरून खाली उतरवण्यात आल्यानंतर पोलिसांना त्यांच्या खिशात ढोकी पोलीस निरीक्षकाच्या नावे लिहिलेली चिठ्ठी आणि मतदारांना आवाहन करणारे पत्र सापडले आहे. ढवळे यांनी सुसाईड नोटमध्ये ओमराजे निंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. या दोघांनी जी फसवणूक केली त्याचमुळे आत्महत्येची वेळ आल्याचे ढवळे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.