Kisan Morcha at Vidhan Bhavan : किसान सभेचा पुन्हा एकदा उद्यापासून लॉन्ग मार्च  (Kisan Morcha ) सुरु होत आहे. (Kisan Sabha Long March) त्यामुळे भाजप - शिंदे सरकारच्या अडचणी वाढणार आहेत. किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च (Farmers Morcha) काढण्याची पुन्हा एकदा हाक दिली आहे. (Onion issue) हजारो कष्टकरी, कामगार उद्या रविवारी नाशिक (Nashik) येथून पायी चालण्यास सुरुवात करतील. (Kisan Sabha Morcha) येत्या 23 मार्च रोजी मुंबई येथे विधान भवनावर चालून जातील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारच्या श्रमिक विरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांमुळे शेतीमालाचे भाव कोसळून अक्षरशः कवडीमोल झाल्यानं किसान सभेने आंदोलनाची घोषणा केली आहे .किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होतेय. माजी आमदार जिवा पांडू गावित यांच्या नेतृत्वात गेल्यावेळी या आंदोलनाने शिंदे - फडणवीस सरकारच्या अडचणी वाढवल्या होत्या. मात्र गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करुन हे आंदोलन नाशिक जिल्ह्यातच रोखले होते.


मात्र, कांदा निर्यातीवर निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे कांदा पडून आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नाही. तसेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकासान झाले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी आक्रमक झाला आहे. राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेतकरी अडचणीत आहे.



दरम्यान, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी प्रश्नावर विरोधकांनी शिंदे - फडणवीस सरकारला जोरदार घेरले होते. आता किसान सभा आक्रमक झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.  शेतकरी प्रश्नाविर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत सरकारला धारेवर धरले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही मदत देणार आहोत. पंचमाने सुरु आहेत. त्यानंतर मदत करणार आहोत, असे सांगून विषय संपवला. मात्र, छगन भुजबळ यांनी हा प्रश्न पुन्हा उचलून धरला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.


अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे नुकसान 


दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावस आणि गारपिटीने सतराशे हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक रब्बी पिकांचा समावेश असून त्याखालोखाल फळबागांना फटका बसला आहे. गहू आणि ज्वारी पिकं भुसापात झाली आहेत. त्यासोबत पपई आणि केळीचे देखील यात नुकसान झाला असून, शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहेत. लवकरच पंचनामे पूर्ण होतील मात्र मात्र शेतकऱ्यांना मदत देखील तातडीने मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करू लागला आहे. जिल्ह्यातील नवापूर, नंदुरबार आणि शहादा तालुक्यात सर्वाधिक अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.