कोल्हापूर : Swabhimani activists clash : केंद्रीय पाहणी समिती (Central Inspection Committee) दोन महिन्यांनंतर कोल्हापुरात आल्याने शेतकरी संतप्त (Farmers angry) झाल्याचे पाहायला मिळालेत. त्यानंतर विरोध करताना पोलीस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांत झटापट झाल्याने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Farmers angry in kolhapur, Swabhimani activists and Police clash)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूरग्रस्त भागाच्या नुकसानीची पाहणीसाठी केंद्रीय समिती कोल्हापुरात दाखल झाली आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु होती. पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी हे केंद्रीय पथक आज करणार आहे. बैठकीनंतर शिरोळ तालुक्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले. 



दरम्यान, केंद्रीय समिती दोन महिन्यानंतर आल्याने शेतकरी संतप्त झालेत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध केला. बुके देऊन शेतकरी करणार निषेध करणार होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्त्ये आक्रमक झालेत. त्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटपट झाली.