१९ मार्चच्या उपोषणात सरकारी कर्मचारी किसानपुत्रांनीही सहभागी व्हावे
सरकारी नोकरी करीत असलेल्या किसानपुत्रांनीही १८ मार्च १९ रोजी उपवास करुन शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त कराव्यात, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने अमर हबीब यांनी केले.
आंबाजोगाई: सरकारी नोकरी करीत असलेल्या किसानपुत्रांनीही १८ मार्च १९ रोजी उपवास करुन शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त कराव्यात, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने अमर हबीब यांनी केले.
आपल्या घरात एखादी दुःखद घटना घडली तर आपण शोक व्यक्त करतो. त्याला कोणी बंधन आणू शकत नाही. शेतकऱयांच्या आत्महत्या या आपलया कुटुंबात दररोज घडणाऱ्या दुःखद घटना आहेत. १९ मार्च १९८६ रोजी चिल गव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्त्या केली होती म्हणून आपण सहवेदना व्यक्त करण्यासाठी तो दिवस निवडला आहे.
सगळ्यांनी एकत्र बसूनच उपोषण केले पाहिजे असे नाही. एकेकट्याने आपले काम करीत उपवास धरावा. आपल्यापैकी अनेकजण धार्मिक उपवास धारतातच ना. मग १९ मार्च रोजी शेतकऱ्यांचा उपवास धरावा!
हा उपवास, कोण्या विशिष्ट पक्षाचा, संघटनेचा नाही. हा उपवास प्रत्येक किसानपुत्र आणि पुत्रीचा आहे.
महात्मा फुले म्हणाले होते, 'शेतकऱयांची मुले शिकतील, नोकर्याला लागतील व शेतकऱयांचे पांग फेडतील.' महात्मा फुलेंचा शब्द खरा करून दाखवायची वेळ आली आहे. सरकारी नोकरीत असलेल्या प्रत्येक किसानपुत्रांने १९ मार्च रोजी उपवास करून शेतकार्याविषयीची आपली बांधीलकी बळकट करावी.