शेतकऱ्यांनी बंद केलं पवना धरण
पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरणातील पाणी शेतकऱ्यांनी बंद केले.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरणातील पाणी शेतकऱ्यांनी बंद केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला मावळ तालुक्यात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
या बंदच्या समर्थनार्थ मावळ भागातल्या शेतकऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरणातील पाणी बंद केले. जोवर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्णपणे मान्य केल्या जात नाही तोवर धरणातील पाणी सोडू दिले जाणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतक-यांनी घेतलाय.