नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या मुलींचं चक्काजाम आंदोलन
शेतक-यांना सरसकट कर्जमाफीसाठी तसंच मुला-मुलींना विविध शैक्षणिक सवलती, शैक्षणिक कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर घारगाव इथं शेतक-यांच्या मुलींनी काही काळ चक्का जाम आंदोलन केलं आहे.
नाशिक : शेतक-यांना सरसकट कर्जमाफीसाठी तसंच मुला-मुलींना विविध शैक्षणिक सवलती, शैक्षणिक कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर घारगाव इथं शेतक-यांच्या मुलींनी काही काळ चक्का जाम आंदोलन केलं आहे.
घारगाव महसूल सर्कल कडलक यांना आंदोलनाचं निवेदन देण्यात आलं. लवकरच राज्यभर मोठे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.आंदोलनाच्या मुख्य समन्वयक आणि संगमनेर कॉग्रेसच्या पंचायत समितीच्या सदस्या प्रियंका गडगे यांच्या सह शेकडो महिला आणि तरुणी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
पाहा व्हिडिओ