शेतकऱ्यांचा मोर्चा सोमवारी आझाद मैदानात
नाशिकहून निघालेला किसान सभेचा लॉन्ग मार्च मुंबईच्या वेशीजवळ आलाय.
ठाणे : शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यासाठी नाशिकहून निघालेला किसान सभेचा लॉन्ग मार्च मुंबईच्या वेशीजवळ आलाय. २५ ते ३० हजार शेतकरी आणि शेतमजूर मार्च मध्ये सामिल झाले असून सोमवारी आझाद मैदानात हा मोर्चा धडकणार आहे.
भर उन्हात निघालेला मोर्चा ठाणे जिल्ह्यात
भर उन्हात निघालेला मोर्चा ठाणे जिल्ह्यात पोहचला आहे. महत्वाच म्हणजे या मोर्च्यात शिस्तीच दर्शन घडत आहे. एका रांगेत शिस्तीत हा मोर्चा आगेकूच करत आहे.
एका पंगतीत सर्व शेतकरी आणि शेतमजूर जेवायला
दरम्यान मोर्च्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचंच दुपारच जेवण भिवंडी नजिक सोनाले गावात झाल. एका पंगतीत सर्व शेतकरी आणि शेतमजूर जेवायला बसले असून शिस्तीच दर्शन घडतं. महाराष्ट्रातील मोर्चे शांततेत निघंण्याची परंपरा आहे.नाशिकहुन थेट विधानभवन कड़े निघालेल्या या मोर्च्याने देखिल ही परंपरा शाबूत ठेवली.