बीड : पीक विम्याच्या मुदतीवरून विधानसभेत रणकंदन सुरू असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यात अर्ज भरण्यासाठी शेतक-यांची सेतू केंद्रांमध्ये लूट सुरू असल्याचा झी २४ तासनं पर्दाफाश केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतक-यांच्या सुविधेसाठी सेतू केंद्रात शेतक-यांनी पीक विम्याचे अर्ज भरण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. मात्र हे सुविधा केंद्रच शेतक-यांच्या लुटीचे केंद्र ठरलेले आहेत. हे अर्ज मोफत भरण्याचे आदेश सरकारनं दिलेले असताना तलाठी मंडळ अधिकारी आणि सेतू केंद्र चालक शेतक-यांकडून प्रत्येकी चारशे रुपयांची लूट करत आहेत. 


पीक विमा भरण्याचा आज अखेरचा दिवस असल्यामुळं शेतक-यांनी अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्रांवर गर्दी केली आहे. त्याचाच फायदा उचलत तलाठी, मडंळ अधिकारी आणि सेतू केंद्र चालकांकडून संगनमतानं शेतक-यांना नाडण्याचा प्रकार सुरू आहे.