Nana Patekar On Farmers: 'सरकारकडे मागू नका कोणतं सरकार करायचं हे ठरवा,' असं अवाहन जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केलं आहे. अकराव्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनात सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. (Nana Patekar On Government)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेती अर्थ प्रबोधिनीद्वारा नाशिक येथे 11 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात नाना पाटेकर बोलत होते. यावेळी पाटेकरांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. 


शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी म्हटलं आहे की, 'सरकारकडे मागू नका कोणतं सरकार करायचं हे ठरवा. मला राजकारणाकडे जाता येत नाही कारण कारण जे पोटात ते ओठात येते. मला काढतील ते पक्षातून असे करुन महिनाभरात सर्व पक्ष संपलेले असतील. येथे मनापासून बोलता येते,' असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. तसंच, याना कधी कळणार की मृत्यू येणार, किती तो संचय करायचा, अमर असल्यासारखे काय वागतात, कुठले आदर्श ठेवता आमच्या पिढीसमोर तुम्ही, काय चालले आहे. आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर आम्ही तुमची पत्रास का ठेवायची,' असा टोलाही त्यांनी राजकीय नेत्यांना लगावला आहे. 


'माझी आई सांगायची सोने 16 रुपये तोळा होते आता ते 50 हजार रुपयांवर पोहोचले आहे. सोन्याचा भाव वाढला मग आमच्या गहू-तांदळाचा भाव का वाढत नाही. शेतमालाला रास्तभाव हवा.  पण सरकारकडे मागू नका, सरकार कोणते आणायचे ते ठरवा,' असं सांगत शेतकऱ्यांनी जागे व्हा असे आवाहन नाना पाटेकर यांनी केलं आहे. 


'शेतकरी कधीच अडवणूक करणार नाही, काहीही झाले तरी. आत्महत्या केली तरी परत जन्मून मी शेतकरीच होणार अशी जात आहे. मला शेतकऱ्याचा जन्म नको असे शेतकरी कधीच म्हणणार नाही. जनावरांची भाषा आम्ही जाणतो, तुम्हाला आमची भाषा कळात नाही का? आम्ही फक्त नावापुरते स्वतंत्र झालो आहोत. शेतकऱ्याची गुलामी संपायला तयार नाही. त्या गुलामगिरीच्या विरोधात लिहा. गोंजारणारे दुःख मांडू नका,' असंही पाटेकरांनी म्हटलं आहे.