नाशिक : राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी मध्यरात्रीपासून महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. यानूसार आज या शेतकरी संघटना राज्यभर चक्काजाम करणार आहेत. नाशिकमध्ये बुधाजीराव मुलीक यांच्या आध्यक्षतेखाली शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


शेतक-यांनी कुठलंही शेतमाल वाहन राज्यात फिरू देऊ नये असं आवाहन शेतक-यांना करण्यात आलं. बाजारासमीतील अडते, व्यापारी, वाहतूकदार आणि नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती यावेळी करण्यात आली. ८ तारखेला कृषी परिषदेत राजू शेट्टींसह सर्व नेते नाशिकमध्ये पुढचा निर्णय घेणार असून तोपर्यंत संप कायम राखण्याचं बैठकीत एकमत झालं. बाजार समिती आवारात झालेल्या या बैठकीत राजकीय पक्षांना बाजूला ठेवण्यात आलं.