मुंबई : संपर्ण कर्ज मुक्ती आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा, अशी मागणी करत जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, त्यामुळे सत्तेतून बाहेर पडण्याचे खासदार राजू शेट्टी यांनी तचे संकेत दिलेत. शेट्टी यांनी एक महिन्याची राज्य सरकारला दिली मुदत दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. ते सोडवले जात नाहीत. त्यामुळे सत्तेत सहभागी होण्यासाठी पाठिंबा दिल्याचा पश्चाताप होत आहे. याबाबत नेमके काय केले पाहिजे, याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारिणी बठकीत घेण्यात येणार आहे, असे सांगत खासदार राजू शेट्टी यांनी सत्तेतून बाहेर पाडण्याचे संकेत दिले. दि. ८ रोजी बैठक होत आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणालेत.


राजू शेट्टी यांनी भाजपवर टीका केली. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय भाजप घेऊ शकत नाही. भाजप हा विद्वानांचा पक्ष आहे. त्यांना शेतकऱ्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. अशाने हे सरकार नक्कीच अडचणीत येईल. शेतकऱ्यांचा या सरकारवरील विश्वास उडाला आहे, असे शेट्टी म्हणाले. 
 
दरम्यान, संपूर्ण कर्जमाफीसाठी सुरु असलेला शेतकऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी स्वाभिमानीचा बिल्ला छातीवर लावून लुडबूड करणारे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना संघटनेच्या कार्यकारिणीसमोर बोलावून जाब विचारला जाईल, असे ते म्हणालेत.