Scam in PM Kisan Yojana Amravati : पीएम किसान योजनेचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला. मात्र अमरावती जिल्ह्यात या योजनेत मोठा घोळ झाल्याचं समोर आलंय.. अचलपूर तालुक्यातील शहापूर गावातील 82 शेतकऱ्यांचं अनुदान गेल्या 2 वर्षांपासून जम्मू काश्मीरमधील शहापूर इथं जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्यानं एकच खळबळ उडालीय. अनुदान मिळवण्यासाठी हे शेतकरी शासन दरबारी उंबरठे झिजवतायत... मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शेतक-यांनी अखेर आमदार बच्चू कडूंकडे तक्रार केली. मुंबई, महाराष्ट्रातील उदयोग गुजरातला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अनुदान जम्मू काश्मीरला असं होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली पाहिजे, असा टोला बच्चू कडूंनी सरकारला लगावलाय.
पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजारांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा शेतकऱ्यांना प्रचंड फायदा झाल्याचा दावा केला जातो. मात्र, अमरावतीमधील प्रकरणामुळे या योजनेतील कटू वास्तव समोर आले.


भंडा-यात बनावट सातबारे तयार करून शेतक-यांचे लाखो रुपये लाटले


भंडा-यात बनावट सातबारे तयार करून शेतक-यांचे लाखो रुपये लाटल्याचा प्रकार समोर आलाय. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक इथल्या सहकारी संस्थेत धान खरेद्री केंद्रात हा प्रकार घडलाय. धान खरेदी केंद्राच्या डाटा ऑपरेटर्सनी एकट्या पिंपळगावमध्ये 25 बोगस शेतकरी तयार केले आणि त्यांच्या नावाचे सातबारे तयार करून पैसे उचलल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलंय.


पिकाला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी  तोट्यात


बीडच्या गेवराईत एका शेतक-याची विचित्र अवस्था झालीये. 4 वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून शेतक-यानं विहिर खोदली. या विहिरीला ऐन उन्हाळ्यात भरपूर पाणीही आहे. मात्र सर्व असूनही शेतात कुठलंही पीक घेतलेलं नाही. पिकाला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी पाणी असूनही तोट्यात आहे. याशिवाय कुठल्या हंगामात कुठलं पीक घ्यावं, याचं योग्य मार्गदर्शन नसल्यानं शेतक-याच्या पदरात निराशाच पडलीये.