रत्नागिरीत भीषण अपघात; दोन लहान लेकरांसह 8 जणांचा मृत्यू
रत्नागिरीतल्या दापोलीत ट्रक आणि वडापचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.
Ratnagiri Accident News : रत्नागिरीत जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. दापोली येथील आसूद जोशी आळीत ट्रक आणि वडापची टक्कर होऊन हा अपघातात झालाय. या अपघतात चार जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये 2 मुली आणि 2 पुरुषांचा सामावेश आहे. या अपघातातील पाच जखमींना उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले होते. मृतांचा आकडा आणखी वाढला आहे. या अपघातात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
मरियम गौफिक काझी (वय 6 वर्षे), स्वरा संदेश कदम (वय 8 वर्षे), संदेश कदम ( वय 55 वर्षे) फराह तौफिक काझी ( वय 27 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण अडखळ येथे राहणारे आहेत. तर, हर्णै अनिल उर्फ बॉबी सारंग ( वय 45 वर्षे) यांचा देखील मृत्यू झाला आहे.
विनायक हशा चौगुले ( वय 45 वर्षे), श्रध्दा संदेश कदम ( वय14 वर्षे), मिरा महेश बोरकर (वय 22 वर्षे), सपना संदेश कदम ( वय 34 वर्षे), भुमी सावंत (वय17 वर्षे), मुग्धा सावंत ( वय 14 वर्षे), वंदना चोगले ( वय 38 वर्षे), ज्योती चोगले (वय 9 वर्षे), पंढरी, विनोद चोगले (वय 30 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत.
असा झाला अपघात
दापोली हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास ट्रक आणि मॅजिक प्रवासी रिक्षा यांच्यात धडक होवून भीषण अपघात झाला. या भीषण अपघात 14 जण जखमी झाले आहेत. त्यातील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात हर्णै येथील प्रवासी मॅजिक चालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ट्रक चालकाच्या चुकीमुळे पाच जणांना जीव गमवावे आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात
पुणे-सोलापूर महामार्गावरील उरळी कांचनजवळ खेडेकर मळा परिसरात विचित्र अपघात झालाय. आयशर टेम्पो, चारचाकी कार आणि दुचाकी अशा तीन वाहनांनी एकमेकांना धडक दिलीय. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून 7 जण किरकोळ जखमी झाले आहेत. दुपारच्या सुमारास एक टेम्पो पुण्याच्या दिशेनं निघाला होता, त्यात बांधकामाच्या लोखंडी प्लेट होत्या. यावेळी टेम्पोचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा टेम्पो सोलापूरच्या दिशेनं जाणा-या चारचाकी गाडीला धडकला. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकीच्या मागे असलेल्या बाईकलाही टेम्पोची जोरदार धडक बसली. या अपघातात चारचाकीत बसलेलं कुटुंब किरकोळ जखमी झालंय. बाईकचालकालाही दुखापत झालीय. तर टेम्पोतील दोन जण गंभीर जखमी आहेत.