Accident Samruddhi Highway :  शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (shirdi nagpur samruddhi mahamarg) अपघातांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. समृद्धी महामार्गावर अमरावतीजवळ (Amravati) कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.  समृद्धी महामार्गावर अमरावतीजवळील हिंगणगाव जवळ हा अपघात घडला आहे. कारचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कारमधील सात प्रवासी जखमी झाले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त कार नागपूर कडून अकोला कडे जात असताना हा अपघात घडला. 
भरधाव वेगात असलेल्या कारचा टायर अचानक फुटला. यामुळे ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जाऊन धडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 


ट्रॅव्हल बसचा टायर फुटून अपघात


19 फ्रेब्रुवारी रोजी देखील असाच अपघात घडला होता. समृद्धी महामार्गावरील (samruddhi mahamarg) वाशिम जिल्ह्यातील दोनद नजीक  एका खाजगी ट्रॅव्हल बसचा टायर फुटून अपघात झाला. या अपघातात बसमधील 14 प्रवासी जखमी झाले होते. नागपूरवरून मुंबई ला जाणाऱ्या मेहरा ट्रॅव्हल्सची ही बस होती. भरधाव वेगात असलेल्या या बसचा मागील टायर फुटला. यामुळे बस पलटी होऊन अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.


शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी फायदेशीर


शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्ग (shirdi nagpur samruddhi mahamarg) प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर केवळ 5 तासांच पार करता येत आहे. 11 डिसेंबर 2022 पासून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. दररोज हजारो प्रवासी या मार्गावरुन प्रवास करत आहे. साई भक्तांसाठी या मार्गावर एसटी महामंडळातर्फे विशेष बस सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. या बस सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.