लेकीकडून प्रेमविवाहाचा हट्ट, बापाला मान्यच नव्हतं; मुलीला संपवलं अन् असं काही केलं की...
Nanded Honour Killing : मूखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनू तांडा येथे आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मनू तांडा येथील सोळा वर्षीय मुलीचे आपल्याच नात्यातील एका तरुणावर प्रेम होते.
Nanded Crime News: प्रेमविवाहाचा हट्ट करणाऱ्या स्वतःच्या मुलीवर कोयत्याने वार करून हत्या ( Honour Killing ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्याने हे कृत्य केल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करून तिचा अंत्यविधीही गरबडीने करून टाकला. नांदेड (Nanded News) जिल्हयातील मुखेड तालुक्यातील ही धक्कादायक घटना पोलिसानी (Nanded Police) शिताफीने उघडकीस आणली.
मूखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनू तांडा येथे आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मनू तांडा येथील सोळा वर्षीय मुलीचे आपल्याच नात्यातील एका तरुणावर प्रेम होते. मयत मुलगी इयत्ता दहावीत शिकायला होती. त्याच मुलाशी लग्न करायचं असा हट्ट मुलीने धरला होता. त्यांच्या प्रेमाला वडील अण्णाराव राठोड यांचा विरोध होता. मुलीने आणखी शिकावे अशी वडिलांची इच्छा होती. पण...
मुलगी समजावून सांगूनही एकत नव्हती. रागाच्या भरात अण्णाराव राठोड यांनी कोयत्याने मुलीवर वार केला. वार थेट डोक्यात बसला. डोक्यावर गंभीर इजा झाल्याने तिचा मृत्यू झाला. 2 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. त्याच दिवशी मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करुन अंत्यसंस्कार गावातच उरकून टाकण्यात आला. पोलिसांना याची कुणकुण लागल्यानंतर सखोल तपास सुरू केला. मुलीच्या आईला विश्वासात घेऊन पोलीसांनी माहिती काढली. तेव्हा मयत मुलीच्या आईने सर्व घटनाक्रम उलगडला. त्यांनतर मुक्रमाबाद पोलिसानी आरोपी पिता अण्णाराव राठोड याला अटक केली. या घटनेने मुखेड तालुक्यात खळबळ उडालीये.
दरम्यान, प्रेमविवाहाविरुद्ध ऑनर किलिंगच्या घटना घडल्याचं पहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी नंदूरबारमधअये ऑनर किलिंगची घटना समोर आली होती. त्यानंतर आता नांदेडमध्ये वडिलांनीच मुलीला संपवल्याची घटना घडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.