Little Giral Viral Video : वडील हा शब्द उचारला की भीती आणि आदर अशी भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात येते. प्रत्येक लहान मुलांसाठी त्यांचे आई वडील हे दैवत आणि सर्वस्व असतात. आयुष्यभर वडील मुलांसाठी झटतात, नारळासारखे वरवर दिसणारे हे दगड दिसणारे वडील मनातून मुलांसाठी खूप हळवे असतात. मुलगी आणि वडिलांचं नातं तर जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर चिमुकली आणि त्यांचा वडिलांचं सुंदर नातं दाखवणारे व्हिडीओ पाहिला मिळतात. त्यातील महाराष्ट्रातील एक लाडूबाईने तर अख्खा सोशल मीडियाला वेड लावलं आहे. 15 दिवसांनी बाबा घरी आपल्यावर या गोडूलीची प्रतिक्रिया पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं. तर जेव्हा बाहेर गावी गेला बाबा गोडुलीला फोन करतो तेव्हा तर तिच्या आनंदाचा थाराच नसतो. 


इन्टाग्रामवर तिची आई ने binnar_damini या अकाऊंटवर तिचे हे व्हिडीओ शेअर केले आहेत. या चिमुकलीचं नाव विहा दामिनी नितीन सदगीर आहे. हे गोंडस लेक अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा गावात राहतात. त्याचा वडिलांना कामासाठी बाहेर गावी जावं लागतं. त्यावेळी बाबांची लाडकी त्यांचा एक फोनने कशी भावूक होते हे पाहून तुम्ही पण तिच्या प्रेमात पडाल.  (Father Daughter Instagram video love and emotional little girl video today trending video on Fathers Day 2023 google trends now)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Viha Sadgir (@babyviha30)


20 महिन्यांची ही विहा अख्खा महाराष्ट्राला तिच्या गोंडस रुपाने आणि कृतीने वेड लावत असून जो तो म्हणतोय एक लेक नक्की असावी. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Viha Sadgir (@babyviha30)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Viha Sadgir (@babyviha30)


विहासारख्या अजून दोन गोंडस चिमुकलींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हिडीओमध्ये चिमुकली थकलेल्या बाबांचे इवल्याशा हाताने डोके चेपताना दिसतं आहे.  तर _cocoandmummaandrohitranka9 हा व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये हा माझा बाबा आहे, हे म्हणते त्यावर आपला हक्क गाजवतेय. ही चिमुकली आजीला सांगतेय हा तुझा अनिकेत नाही माझा बाबा आहे. dreamgirl_shraavi या अकाऊटंवर पोस्ट करण्यात आला आहे. 



सोशल मीडियावरील लाडूबाईंचे हे व्हिडीओ कितीही वेळा बघितलं तरी मन भरत नाही.