चंद्रपूर : चंद्रपुरातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. बापाने मुलीच्या मैत्रिणवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार येथे घडला आहे. यातून ही मुलगी गरोदर राहीली आहे. मुलीच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम योगेश दोहतरेला अटक करण्यात आलीय. हा नराधम त्याच्या मुलीच्या घरी येणाऱ्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करत होता.


चार महिन्याची गर्भवती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अतिशय धक्कादायक म्हणजे अवघ्या बारा वर्षांची ही मुलगी चक्क चार महिन्यांची गर्भवती राहिली. त्या मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर हा प्रकार उघड झाला. हा नराधम तिच्यावर अत्याचार करायचा आणि कुठे वाच्यता केली तर जीवानिशी मारायची धमकी द्यायचा असे पीडितेने सांगितले. 


नराधमास पोलिसांनी अटक केली असून पुढली चौकशी सुरु आहे.