अमर काणे, झी मीडिया, नागपूर : देशभरात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीमुळे केंद्र सरकारवर (central government) सातत्याने टीका केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा वापर विरोधी पक्षाकडून वारंवार करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता एखाद्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) विरोधातच सीबीआयचा (CBI) वापर होऊ नये अशी शंका एका काँग्रेस नेत्याने उपस्थित केली आहे.


माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या जयंती निमित्त आज नागपुरात (Nagpur) काही काँग्रेसने (Congress) टेक्नॉलॉजी यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांनी, सध्या भाजपमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खच्चीकरण सुरू आहे. एखाद्या दिवशी गडकरींच्याच विरोधात सीबीआयचा वापर होऊ शकतो, असे वक्तव्य केलं आहे.


यावेळी बोलताना केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावर कन्हैय्या कुमार यांनी लक्ष वेधले.  केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर देशाच्या सुरक्षेसाठी करण्याऐवजी केंद्र सरकार स्वतःची खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा वापर करत आहे.


"विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. आम्हाला तर शंका आहे की एखाद्या दिवशी गडकरींच्या विरोधात ही सीबीआयचा वापर होऊ शकतो," असे सूचक वक्तव्य ही कन्हैय्या कुमार यांनी केले आहे.


युवा है जोश में लायेंगे इन्हे होश में या घोषवाक्य सह काढण्यात आलेल्या रॅलीच्या माध्यमातून देशाला विकणाऱ्यांच्या विरोधात लोकांना जागे करण्याचे काम करणार असल्याचेही कन्हैय्या कुमार म्हणाले. 


आज देशासमोर बेरोजगारी, महागाई ही आव्हाने आहेत. शासकीय कंपन्या विकल्या जात आहेत. हे सर्व थांबवायच्या असेल तर लोकांना एकत्रित आणण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे कन्हैय्या कुमार म्हणाले.