Pune Crime News : एका डॉक्टरने पत्नीची हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर या डॉक्टरने आपल्या दोन मुलांना विहिरीत टाकून स्वतःता देखील आत्महत्या केली आहे. डॉक्टरने इतके टोकाचे पाऊल का उचलले या मागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथील हृदय हेलवणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे दौंड तालुका हादरला आहे (Pune Crime News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. अतुल शिवाजी दिवेकर ( वय 42) वर्षे या डॉक्टरचे नाव आहे. शिवाजी यांनी पत्नी पल्लवी दिवेकर (वय 39 वर्षे) हिची हत्या केली. यानंतर त्यांनी अद्वित मुलगा अतुल दिवेकर ( वय 9 वर्षे) आणि मुलगी वेदांतिका दिवेकर (वय 6 वर्षे) या दोघांना विहीरीत फेकले. पत्नी आणि मुलांगी हत्या केल्यानंतर या डॉक्टरने स्वत: देखील आत्महत्या करत जीवन संपवले आहे. अंगावर शहरे आणणाऱ्या या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हाच हादरून गेला आहे.


डॉक्टरची पत्नी शिक्षिका


पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या अतुल दिवेकर यांची पत्नी शिक्षिका आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. प्रत्येक पती पत्नीमध्ये वाद होत असतात. मात्र, डॉक्टर आणि शिक्षिका अशा उच्च शिक्षित दाम्पत्याच्या कुटुंबाचा अत्यंत दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


असा झाला घटनेचा खुलासा


डॉक्टर अतुल दिवेकर यांनी मृत्यू पूर्व लिहीलेल्या चिठ्ठीमुळे या घटनेचा उलगडा झाला आहे.  कौटुंबिक वादातून हे कृत्य केले असल्याचे डॉक्टर अतुल दिवेकर यांनी मृत्यू पूर्व चिठ्ठीत नमूद केले आहे. मी माझ्या बायकोचा त्रासाला कंटाळून तिला मारून टाकले असून माझा एक मुलगा व एक मुलगी गणेशवाडी तालुका दौंड येथील जगताप विहिरीमध्ये मारून टाकले असून मी स्वतः जीवन संपत आहे असेही त्यांनी या चिठ्ठीत नमूद केले आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर अतुल दिवेकर यांनी तिचा गळा दाबून हत्या केली. नंतर दोन मुलांना विहीरीत टाकून त्यांची हत्या केली. यानंतर त्यांनी स्वतः घरी जाऊन आत्महत्या करुन कुटुंबच संपवले आहे.