सांगली : सांगलीत तासगावमधील 19 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रणाली प्रकाश पाटील असं तरुणीचं नाव असून ती वाळवा तालुक्यातील साखराळे गावची आहे. तासगावच्या शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये ती शिकत होती.


पंख्याला ओढणीच्या मदतीने गळफास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रणालीने रविवारी सकाळी रुममध्ये कोणी नसल्याचं पाहून तिने पंख्याला ओढणीच्या मदतीने गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रणाली शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये ड्रेस डिझायनिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती.


आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट


प्रणालीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, पोलिस शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमधील विद्यार्थिनी आणि प्रणालीच्या रुममेट्स, शिक्षिका यांच्याकडे अधिक चौकशी करत आहेत.