मुंबई-औरंगाबाद विमानात प्रवाशांना जीवघेणा अनुभव
हा सगळा थरार तब्बल पाच ते सात मिनिटे सुरू होता.
मुंबई : मुंबई औरंगाबाद विमानात प्रवाशांना जीवघेणा अनुभव आला. विमान टेक ऑफ झाल्यानंतर दहा मिनिटांतच विमानातील प्रवाशांना पायलटने वातावरण खराब असल्याचं सांगितलं आणि सीट बेट लावायच्या सूचना झाल्या. त्यावेळी विमानातल्या प्रवाशांचा काळजाचा जणू ठोकाच चुकला. विमान त्यावेळेस एका हवेच्या पोकळीत गेल्याने अचानक जसं पाळण्यामध्ये उंचावरून खाली येताना वाटतं तसा प्रवाशांना अनुभव आला आणि प्रवासी घाबरले. विमानात आरडाओरड सुरू झाला. अनेकांच्या हातातील खाण्याचे पदार्थ खाली पडले.
पाच ते सात मिनिटे थरार
हा सगळा थरार तब्बल पाच ते सात मिनिटे सुरू होता. मात्र त्यानंतर विमान सुरळीत झालं आणि प्रवाशांना यानंतर पुन्हा एकदा लँड होताना विमानाचा आवाज केला. एक हार्ड लँडिंग प्रवाशांनी अनुभवलं. अनेक प्रवाशांना त्यामुळे हा विमान प्रवास जीवघेणा होता की काय असं वाटू लागलं. मात्र सुदैवानं सुखरूप आल्याने त्यांनी ईश्वराचे आभार मांनले.
महत्त्वाचं म्हणजे या विमानात अनेक प्रतिष्ठित व्यक्ती होत्या. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ याच विमानाने औरंगाबादेत येत होते. खासदार प्रीतम मुंडे, शहरातील काही उद्योजक, राजकीय नेतेसुद्धा या विमान प्रवासात होते.