सातारा : 'फाईट' या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान केलेल्या तोडफोडीचा स्टंट राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले समर्थकांच्या चांगलाच अंगलट आलाय. चित्रपटाची फुकटची प्रसिद्धी व्हावी, अशी भाबडी आशा ठेऊन हा स्टंट केल्याची चर्चा साताऱ्यात रंगलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर निर्मात्याने कोणताही गुन्हा दाखल केला नाही. मात्र, सातारा पोलिसांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. शाहुपुरी पोलिसांनी या घटनेत सुमोटोचा गुन्हा स्वतः दाखल केला आणि हा स्टंट करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच हिसका दिलाय. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केलीय. 


'फाईट' सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आलेल्या बॅनर आणि गाडीची उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या चित्रपटातील 'साताऱ्यात फक्त मीच चालणार' या वाक्यावर आक्षेप घेत, उदयनराजे समर्थकांनी ही तोडफोड केली होती. साताऱ्यातील राधिका पॅलेस या हॉटेलमध्ये फाईट या सिनेमाची पत्रकार परिषद होती, त्यावेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालतला होता.


साताऱ्यात फक्त मीच चालणार' असा एक डायलॉग फाईट या २० डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात आहे. मात्र या डायलॉगवर आक्षेप घेत फाईट या चित्रपटाच्या प्रेस दरम्यान उदयनराजे समर्थकांनी चित्रपटाचे बॅनर फाडले आणि दिग्दर्शक जिमी मोरे यांच्या कारची तोडफोड केली होती.