उल्हासनगर : बिलाच्य पैशाच्या वादावरून झालेल्या भांडणातून चायनीज  हॉटेलमधील कामगारानं ग्राहकाच्या अंगावर उकळतं तेल टाकण्याचा धकाकदायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेत दीपक म्हस्के हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. उल्हासनगरमध्ये मनोज कोळीवाडा चायनीज या होंटेलमध्ये विकी म्हस्के हा तरुण चायनीज खाण्यासाठी आला होता. 


तिथे त्याचा हॉटेल मालकाच्या मुलाशी बिलावरून वाद झाला. त्यानंतर विकीनं फोन करुन आपल्या भावाला दुकानात बोलवून घेतलं. विकीचा भाऊ दीपक तिथे आला आणि त्यानं चायनीजच्या गाडीवर दगड फेकून मारला. 


यानंतर हॉटेलमधील कामगारानं कढईतील उकळतं तेल दीपक आणि विकीच्या अंगावर फेकलं. उकळतं तेल तोंडावर उडाल्यानं दीपकचा चेहरा भाजला.