ठाणे : मुंबई नाशिक मार्गावरील शांग्रिला रिसॉर्टमध्ये परवा रविवारी दोन गटांमध्ये जबर हाणामारी झाली. सूरतहून आलेल्या एका तरूणानं महिलेची छेड काढल्यानं या वादाला सुरूवात झाली आणि त्यातून हा हाणामारीचा प्रकार घडला. शांग्रिला रिसॉर्टच्या व्यवस्थापकाच्या केबिनबाहेरच ही तुंबळ हाणामारी झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्कादायक बाब म्हणजे हाणामारी करणारे तरूण मद्यपान करून आले होते. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं अखेर पोलिसांना पाचारण करावं लागलं. याप्रकरणी भिंवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.