नांदेड : नांदेडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये राडा झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाचा ठराव मांडण्यास शिवसेनेच्या आमदारांनी विरोध केला. त्यामुळे संतापलेले काँग्रेसचे आमदार पालकमंत्री रामदास कदम यांच्यासमोरच शिवसेना आमदारांना भिडले. 


दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. काँग्रेस आमदार अमर राजूरकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यात धक्काबुक्की झाली.