सांगली :  आज सांगलीत बहुजन संघटनांनी मोर्चा काढण्यात येणार आहे. विश्रामबागेतल्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. 'कोरेगाव भीमा' घटनेला जबाबदार असणाऱ्या आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोषींना पाठीशी घालू नये, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी दलित संघटनांतर्फे करण्यात आली आहे.


या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी काल सांगली पोलीसांनी शहरात संचलन करून शांततेचं आवाहन केलं. 


भीती बाळगण्याचं कारण नाही


यामध्ये विविध पथकातील ४५० पोलीस सहभागी झाले होते. हे संचलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरून केल गेलं.


सांगलीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असून सर्वसामान्य जनतेने कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नसल्याचं सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी यावेळी सांगितलं. 


संभाजी भिडेंवर गुन्हा 


सांगलीचे रहिवासी असणारे संभाजी भिडे यांच्यावर याप्रकरणी चिथावणीखोर भाषणं दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर भिडेंच्या समर्थनार्थ सांगली जिल्हाधिकारी कार्यालवर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला