मुंबई : कोल्हापूरचे शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्यावर त्यांच्यावर मूळ गावी उंबरवाडी इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले. त्यांच्या उंबरवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरेज सेक्टरमध्ये दहशवाद्यांशी सामना करताना त्यांना वीरमरण आले. काश्मीरच्या गुजर सेक्टरमध्ये पाक सैन्यासोबत झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले आहे. ६ मराठा बटालियनमध्ये ते कार्यरत होते. दोन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पार्थिव गावात दाखल झालं. गावच्या वीरसुपुत्राला मानवंदना देण्यासाठी नागरिकांची गर्दी जमा झाली होती. (पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे जोतिबा चौगुले शहीद) 


२००२ मध्ये जोतिबा चौगुले मराठा लाईट इन्फन्ट्रीत रूजू झाले होते. शहिद जवान जोतिबा चौगुले यांचा जन्म २३ सप्टेंबर १९८२ या दिवशी झाला. बालपणापासून धाडसी वृत्तीचे चौगुले मराठा लाईट इन्फन्ट्रीत भारतमातेच्या रक्षणासाठी रूजू झाले. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, ९ वर्षांचा मुलगा अथर्व आणि ३ वर्षांचा मुलगा हर्षद असा परिवार आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या शहिद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं  जनसागर लोटला होता.


रविवारी रात्री पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धबंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. रात्री ९.३०च्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यास सुरूवात केली. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार होणाऱ्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती निर्माण झाली होती.