जळगाव : Eknath Khadse on Jalgaon District Bank : जिल्हा बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा विरोधकांचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी खोडून काढला आहे. एक रुपयाचा जरी आपण गैरव्यवहार केल्याचे कोणी सिद्ध करून दाखवले तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, असे प्रति आव्हान दिले. विरोधकांकडून सध्या जे काही सुरू आहे तर फक्त आपली छळवणूक करण्यासाठी सुरू आहे, आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नसल्याने तुम्ही ईडी लावा अथवा काय लावायचा ते लावा आपलं थेट आव्हान आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटलेय. (Financial scam in Jalgaon District Bank ?, Eknath Khadse said, inquire, if the scam is proved, I will retire from politics)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या ( Jalgaon District Bank Election) पार्श्वभूमीवर काल जळगाव येथे महाविकास आघाडीचे सहकार पॅनलचा प्रचार दौरा होता. या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने अध्यक्षीय भाषण करताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.


मागील सहा वर्षांच्या पूर्वीचा जिल्हा बँकेचा कारभार पाहिला तर जिल्हा बँक अवसायनात जाण्याच्या मार्गावर होती, मात्र रोहिणी खडसे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर अतिशय काटकसरीचे आणि नियोजन पूर्वक धोरण जिल्हा बँकेने राबविले असल्याने जिल्हा बँक चांगले काम करणाऱ्या देशातील पहिल्या दहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे, असे ते म्हणाले. आगामी काळात अजूनही ही बँक चांगल्या प्रकारे काम करणार आहे, असे खडसे यांनी सांगितले.


चुकीचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राला दिले गेले. नंतर काही विरोधकांनी बँकेच्या कारभार विषयी शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र एक रुपयाचा देखील गैरव्यवहार जिल्हा बँकेत झालेला नाही. अशा शंका उपस्थित करणाऱ्यांसाठी आपल आव्हान आहे, त्यांनी जिल्हा बँकेत झालेला गैरव्यवहार समोर आणून दाखवावा. आपण राजकारणातून संन्यास घेऊ, केवळ आपली छळवणूक करण्यासाठी विरोधक वेगवेगळे प्रयोग करीत आहेत, असा आरोप खडसे यांनी यावेळी केला. 


मात्र आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नसल्याने कोणाला काय चौकशा करायच्या त्या करू द्या, असे एकनाथ खडसे यांनी सांगत मागील काळात बँकेचे केलेले काम पाहता सहकार पॅनलला पुन्हा निवडून देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.