भाजप नगरसेवकाकडून आमदार बच्चू कडूंवर गुन्हा दाखल
भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांच्यावर यापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार, ७ फेब्रुवारीला चांदूरबाजार नगरपरिषदेचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी दाखल केली होती.
भाजप नगरसेवकाविरोधात बलात्काराची तक्रार
बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीविषयक माहिती लपवण्याची लेखी तक्रार केली होती. तर काही महिन्यांपूर्वी गोपालपुर मारे विरोधात अमरावती शहरातील एका महिलेनं बलात्काराची तक्रार केली होती. भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांना जमीन मिळालाय.
पोलिसांवर दबाव आणून गुन्हा दाखल केल्याचा आरोप
गोपाल तिरमारे हे भाजपचे नगरसेवक असल्यानं वरिष्ठ पातळीवरून पोलिसांवर दबाव आणून गुन्हे दाखल केल्याचा आरोप बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी केलाय.