रायगड : रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेंच पाक्षीक दैनिक सामनाची होळी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाये. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला गांडूळाची उपमा देत टीका केली होती. त्यानंतर सामनातून अजित पवारांवर छत्रपती शिवरायांचा अवमान करणा-या छिंदमची अवलाद असल्याचं टीकास्त्र सोडण्यात आलं...त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संतप्त कार्यकर्त्यांनी आदिती तटकरेंच्या नेतृत्वात सामना दैनिकाचं दहन केलयं.