COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यवतमाळ : अनधिकृतपणे कीटकनाशकाची विक्री केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ८ कृषी केंद्र चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. पहिल्यांदाच गुजरातच्या कीटकनाशक कंपनी विरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला. 


मुकुटबन येथे गुजरातमधील यूपीएल कंपनीचे व्यवस्थापक आणि आनंद कृषी केंद्र चालक सुरेंद्र तातेड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. कीटकनाशक कायद्यानुसार ही कारवाई झाली. यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे २० शेतक-यांचा मृत्यू ओढवला होता. 


साडेसातशेहून अधिक शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. कृषी केंद्रांमधून विनापरवानगी हे औषध विकले गेले. मात्र ही परवानगी देणारे आणि औषध विक्रीची तपासणी करण्याची जबाबदारी असलेल्या कृषी  विभागाच्या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही.