भोंदूबाबाचा कारनामा, शेतात होम हवन करुन असे पैसे उकळायचा
एक धक्कादायक बातमी. भूतबाधा झाल्याची भीती दाखवून अघोरी प्रकार करायला लावणाऱ्या भोंदूबाबाविरोधात नांदेडच्या माहूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड : FIR on Bhondu Baba : एक धक्कादायक बातमी. भूतबाधा झाल्याची भीती दाखवून अघोरी प्रकार करायला लावणाऱ्या भोंदूबाबाविरोधात (Bhondu Baba) नांदेडच्या (Nanded ) माहूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदूबाबाचा कारनामा उघड झाला आहे. भूतबाधा झाल्याची भीती दाखवून तो छळ करत असल्याचा आरोप एका पीडित व्यक्तीने केला आहे. भोंदूबाबा रक्ताने हवनविधी करून अघोरी प्रकार करायचा. आतापर्यंत 23 लाख उकळल्याचे पीडित व्यक्तीने म्हटले आहे. याप्रकरणी भोंदूबाबा विश्वजीत कपिले यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा करण्यात आला आहे.
धक्कादायक म्हणजे हा भोंदूबाबा स्वत:च्या रक्ताने हवनविधी करायचा तसे व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. डोंबिवली येथील एक 38 वर्षीय व्यक्ती 2014 पासून भोंदूबाबा विश्वजीत कपिले यांच्याकडे उपचार घेत होता. हा भोंदूबाबा अमावस्या आणि पौर्णिमाला पीडित व्यक्तीला बोलावून शेतात होम हवन करायला लावून पैसे उकळायचा.
या भोंदूबाबाने पीडित व्यक्तीकडून आतापर्यंत 23 लाख उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणात माहूर पोलिसांनी आरोपी भोंदूबाबा विश्वजीत कपिले आणि अन्य तिघांविरोधात जादूटोणा विरोधी कायदा आणि अन्य कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.