बीड : परळी बसस्थानकावरील वितरण विभागात पहाटे 2 वाजता लागलेल्या आगीत लाखो रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली आहे. तसच तिकिट व्हेंडिंग मशीन, वाहकांचे बॅच, कपडे, वाहकांच्या पेट्याही जळाल्या आहेत.


या आगीत अंदाजे चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे. दरम्यान, तिकिट व्हेंडिग मशीन्स जळाल्यामुळे पहाटेपासून एकही बस आगारातून बाहेर पडू शकलेली नाही. केवळ बाहेरुन येणा-या गाड्यांचीच आवक सध्या सुरु आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.