नाशिक : Fire breaks out at Plastis Godown : वडाळा गावात प्लास्टिसच्या गोडाऊनला भीषण आग लागली. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. या आगीने काही क्षणात रौद्र रुप धारण केलं. आग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आग आटोक्यात आणण्याच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी 8 पर्यंत ही आग धगधगत होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतिही जीवित हानी झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. 


- नाशिकच्या वडाळा गावात आग
- प्लास्टिकच्या गोडाऊन लागली आग
- पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास लागली आग
- कोणतीही जिवीत हानी नाही
- शॉर्ट सर्किटमुळे लाग लागली असल्याचा परिसरातील नागरिकांचा अंदाज
- अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटना स्थळी दाखल
- सकाळी 8 वाजे पर्यंत सुरू होती आग
- अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने आटोक्यात आणली आग