ठाणे : ठाण्यातील सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. कापूरबावडी येथील बालकुम फायर स्टेशन जवळ हा मॉल आहे. मॉलमधील सर्व ग्राहकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.


या घटनेत अजून कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मॉल परिसरात मोठ्या प्रमाणात धुरांचं साम्राज्य पसरलं आहे. ग्राहकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम सुरु आहे.