जळगाव : जळगाव - यावल मार्गावर ममुराबादगावाजवळ रासायनिक खताने भरलेल्या चालत्या ट्रॅकने अचानक पेट घेतला. यात ट्रक संपूर्णपणे जळून खाक झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रकच्या इंजिनमध्ये ही आग लागली होती. या आगीमागे ट्रकचे इंजिन गरम झाल्याची चर्चा आहे. कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी या आगीत ट्रकचा पूर्ण कोळसा झालाय. ट्रकला आग लागल्याने काही वेळ दोन्ही बाजूनी वाहतूक कोंडी झाली होती.