पुणे : पुण्यातील विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. सकाळी ११ च्या सुमाराला ही घटना घडली. गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलीसांनी अटक केलीय. भर चौकात घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. व्यावसायीक वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.


रागातून गोळीबार 


 पुण्याच्या एरंडवणे परिसरात राहणारा समीर येनपुरे या तरुणावर हा गोळीबार करण्यात आला. सुदैवानं त्यात त्याला कुठलीच इजा झाली नाही. शु्क्राचार्य मधाळे यानं त्याच्यावर गोळी झाडली. समीरनं त्याच्या विरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार केली होती. त्या रागातून त्यानं समीरवर गोळीबार केला. ही घटना कळताच वरीष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले होते. त्याचप्रामाणे सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी आरोपीला पोलिसांनी आरोपीला अवघ्या काही तासांत जेरबंद केलं.