रायगड : रायगड जिल्हयातील रोहयाजवळील धाटाव औद्योगिक परीसरात डी आर टी अँथिया अॅरोमेटिक कंपनीच्या युनिट २ मध्ये आज सायकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीत सेंट बनवला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अग्नीशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आग भीषण असल्याने अजूनही आग अटोक्यात आलेले नाही. जवळचे रोहा शहर आणि परीसरावर काळया धुराची छाया पसरली आहे. आगीची भीषणता लक्षात घेवून आजूबाजूचा परीसर रिकामा करण्यात आला आहे. जवळच्या रोठखुर्द गावातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 


ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र कंपनीतील रसायनाने पेट घेतल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येते. दुपारच्या पाळीचे कामगार यावेळी कंपनीत होते. सुदैवाने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेले आहे.