जळगाव : जिल्ह्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर एका संशयिताचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.  शाहू महाराज विद्यालयातही १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या निकटवर्तीयांचे तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी कोणीही पॉझिटिव्ह आले नसून एका संशयिताचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. परप्रांतातून इतर मजूर येत असल्याने मोठी अडचण प्रशासन प्रशासनासमोर असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले.


जळगाव जिल्हा रुग्णालयात शंभर बेडची व्यवस्था असलेले आयसोलेशन वार्ड आहेत. शाहू महाराज विद्यालयातही  १०० बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ही आठशे बेड व्यवस्था आहे. त्यासोबतच दोन बेड उपलब्ध होतील, अशी जागा ही शोधून ठेवण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी सांगितले.


लोकप्रतिनिधीची फोटोसाठी चमकोगिरी


दरम्यान, कोरोनाच्या प्रसारातही काही महाभाग लोकप्रतिनिधी आपली प्रसिद्धी करण्याचा आटापीटा करताना दिसत आहेत. जळगावातील वरणगावचे उपनगराध्यक्ष शेख अकलाक यांनी गावात काही भागात औषधी फवारणी केली. मात्र स्वत:च्या फोटोसेशनसाठी अनेक वेळा फवारणी यंत्राचा ट्रॅक्टर एका जागी थांबवून फवारणी करत असल्याचा दिखावा करत होते. फवारणीचा ट्रॅक्टर एकाच जागी उभा ठेवल्याने औषध वाहून जात होतं शिवाय प्रशासनाचं डिझेलही वाया घालवले. 


एकनाथ खडसेही ट्रॅक्टरवर स्वार


एखाद्या नेत्याला तुम्ही कधी ट्रॅक्टर चालवताना पाहिलंय ? लॉकडाऊनमुळे अनेक नेतेही त्यांच्या त्यांच्या गावी अडकले आहेत. भाजप नेते एकनाथ खडसे सध्या मुक्ताईनगरमध्ये आहेत. खडसे स्वतः ट्रॅक्टर चालवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुक्ताईनगरमध्ये ते हायपोक्लोराईडची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करत असल्याचं दिसताहेत.