जळगाव : केंद्र शासनाने देशातील प्रमुख शहरे विमानसेवेने जोडण्यासाठी ‘उडान’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील पहिली उडानसेवा जळगावात पार पडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, शुभारंभालाच विमान तब्बल तीन तास उशिराने आल्याने सर्वानाच ताटकळत बसावे लागले. 


दुपारी एक वाजता एअर डेक्कनच्या १९ आसनी विमानाचे आगमन प्रस्तावित होते. मात्र, तब्बल तीन तास उशिरा म्हणजे दुपारी चार वाजता विमानाचे आगमन झाले. 


पाऊण तासानंतर पुन्हा विमानाने मुंबईच्या दिशेने झेप घेतली. यावेळी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या विमानाने मुंबईहून आले आणि लागलीच याच विमानाने पुन्हा मुंबई परतले.



शुभारंभालाच विमानाला तब्बल तीन तास उशीर