Maharashtra Vidhansabha AI Survey: मतदानाच्या दिवशी मतदार कोणत्या निकषावर आमदार निवडणार? मतदारांच्या मन की बात!
Maharashtra Vidhansabha AI Survey: विधानसभा निवडणुकांचे बिगुल काहीच दिवसांत वाजण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर झीची एआय अँकर झीनियानं नुकताच Maharashtra Vidhansabha AI Survey सादर केला आहे.
Maharashtra Vidhansabha AI Survey: विधानसभा निवडणुकांसाठी अवघे काही महिनेच बाकी राहिले आहेत. लोकसभेनंतर अवघ्या राज्याचे लक्ष विधानसभेकडे लागून राहिले आहे. विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. लोकसभेची निवडणूक पार पाडली आहे. आता विधानसभेला राज्यात कोणाची सत्ता येणार याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. झीची एआय अँकर झीनियानं नुकताच Maharashtra Vidhansabha AI Survey सादर केला आहे. महाराष्ट्रातील मतदारांचा कौल कुणाला असेल, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
AI अँकर झीनिया महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर करणार आहे. झीनियाने एकूण 24 प्रश्नांचा आधार घेत सर्वेक्षण केलं आहे. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व्हे तयार केला आहे. राज्यातील 288 मतदार संघात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं आहे. मतदारांच्या मनातील प्रश्नांच्या आधारे हा सर्व्हे तयार करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुका झाल्यास कोणाचं राज्य येणार? कोणते मुद्दे गेमचेंजर ठरणार? याचाही अभ्यास या सर्व्हेतून केला गेला आहे. लोकसभा निवडणुकांच्या दरम्यानही AI अँकर झीनियाने सर्व्हे सादर केला होता. त्यावेळीही निकालाजवळ जाणारा सर्व्हे झीनियाने सादर केला होता.
मतदान करताना मतदारांच्या मनात काय?
मतदान करताना मतदार कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करतात. किंवा कोणता मुद्दा त्यांना महत्त्वाचा वाटतो याचेही सर्वेक्षण AI अँकर झीनियाने केले आहे. मतदान करत असताना कोणते प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आले आणि त्याचा कौल काय आला, हे जाणून घेऊया.
तुम्ही खालीलपैकी कोणत्या निकषावर मतदान कराल?
पक्ष- 40 टक्के
जात-20 टक्के
धर्म-10 टक्के
उमेदवार- 25 टक्के
इतर- 5 टक्के
भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांना सरकारमध्ये स्थान देणं योग्य आहे का?
योग्य- 20 टक्के
अयोग्य- 70 टक्के
सांगता येत नाही- 10 टक्के
घराणेशाही हा निवडणुकाचा मुद्दा असेल का?
हो- 60 टक्के
नाही- 30 टक्के
सांगता येत नाही- 10 टक्के
घराणेशाहीतून येणाऱ्या उमेदवारांना मतदान करणार का?
हो- 25 टक्के
नाही- 55 टक्के
सांगता येत नाही- 20 टक्के
सर्व्हेक्षणाच्या माध्यामातून हाती आलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील मतदार राजकीय पक्षाकडून बघून मतदान करु शकतात. 40 टक्के लोकांनी पक्षाला निवडलं आहे. तर, निवडणुकांमध्ये कायम गाजत असलेला घराणेशाही हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे असं 60 टक्के जनतेला वाटत आहे. तर 55 टक्के लोक घराणेशाहीतून येणाऱ्या उमेदवारांना मतदान करणार नाहीत, असं सर्व्हेत म्हटलं आहे. 70 टक्के लोक भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांना सरकारमध्ये स्थान देणं अयोग्य आहे, असं म्हणत आहेत.