मुंबई : आघाडी सरकारमधील मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची 100 कोटी रूपयांची  बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. पण भाजप नेत्यांचा असा दावा छगन भुजबळ यांनी फेटाळला आहे. आयटी विभागाने भुजबळ यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त केली अशी प्रेस नोट जारी केलेली नाही. भाजपचे नेते खोटे आरोप करतातचं असं भुजबळ म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'आयटी विभागाने भुजबळ यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त केली अशी प्रेस नोट जारी केलेली नाही. त्यात भुजबळ असा कुठेही उल्लेख नाही. जप्त केलेल्या मालमत्तेशी माझा काहीही संबंध नाही. ती मालमत्ता ज्या कंपनीच्या नावे आहे त्या कंपनीनेही खुलासा केलेला आहे. भाजपचे नेते खोटे आरोप करतातचं.' अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. 


दरम्यान, मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची 100 कोटी रूपयांची  बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून दावा केला. 



सोमय्या ट्विट करत म्हणाले, 'ठाकरे सरकारचे मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या100 कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली...' पण आता सोमय्या यांनी केलेला दावा भुजबळांनी फेटाळला आहे.