एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर रामदास आठवले याची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीये.
सांगली : देवेंद्र फडणवीस यांना मी भेटून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बरोबर चर्चा करून सत्ता स्थापण करा असं सांगणार आहे. असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार अस्थिर झालं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर संकट आहे. (Ramdas Athawale on Eknath Shinde)
खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, असं वक्तव्य देखील रामदाम आठवले यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडून जाणार नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही चालतो. असं ही ते म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय. त्यामुळे शिवसेना फुटण्याच्या मार्गावर आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात देखील ठिकठिकाणी बॅनरबाजी सुरु आहे.
एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची युती तोडून भाजपसोबत युती करावी अशी मागणी त्यांनी केलीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र चेंडू आता एकनाथ शिंदे यांच्याकड़े ढकलला आहे. माझा राजीनामा हवा असेल तर समोर येऊन सांगा असं त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भावनिक आवाहन केलंय. पक्षाच्या मावळ्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विनंती केलीये. त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यांच्यावर कारवाई करू नका, अशी साद गवळी यांनी घातलीये. शिंदेंच्या बंडानंतर त्यावर भाष्य करणा-या गवळी या पहिल्या शिवसेना खासदार आहेत.
शिवसेनेने भाजप सोबत राहिलं पाहिजे ही पहिल्यापासून भूमिका घेतली होती, असं शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी झी २४ तासशी संवाद साधताना सांगितलं. उद्धव ठाकरेंनाही ही भूमिका सांगितली आहे. यापूर्वी भाजप सोबत चर्चा घडवून आणल्याचा गौप्यस्फोट केसरकर यांनी केला. एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचंही केसरकर म्हणाले.