रायगड : सध्‍या कोकणातील मासे खवय्यांची चांगलीच चंगळ झालीय. मच्‍छीमारांच्‍या जाळयात मोठया प्रमाणात मासळी येत असल्‍याने बाजारात मोठया प्रमाणात आवक आहे. यामध्‍ये पापलेट बोंबील यांचे प्रमाण अधिक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मासेमारीला एक ऑगस्‍ट पासून सुरूवात झाली असली तरी सुरूवातीलाच पाऊस आणि उधाणामुळे मासेमारीवर परिणाम झाला होता. मात्र सध्‍या मुबलक प्रमाणात माशांची मरतूक होत आहे. आवक वाढल्‍याने माशांचे दरही घसरले आहे. एरव्‍ही चारशे रूपये जोडीने विकले जाणारी पापलेटची एक कोर म्‍हणजे २२ पापलेटं सातशे ते आठशे रूपयांना विकली जातायत. 


तर बोंबीलांना २० ते ३० रूपये इतका भाव आलाय. त्‍यामुळे खवय्यांची चांगलीच चंगळ झालीय. मात्र श्रावण महिना असल्‍याने मालाला उठाव नाही परिणामी मच्‍छीमारांचे मोठे नुकसान होतंय.