अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे :  कात्रज परिसरात भरपूर पाऊस गुरूवारी झाला. तलावाच्या सांडव्यातून येणारं पाणी रस्त्यावर येत होतं, त्यासोबत भले मोठे मासेही रस्त्यावर येत होते. पुण्यातील खवैय्यांनी ही सुवर्णसंधी सोडली नाही, त्यांनी रस्त्यावर मासेमारी करण्यास सुरुवात केली. तरूणांनी पिशवी भरुन मासे रस्त्यावरील पुराच्या पाण्यातून पकडले. शंभर रुपये किलो दोनशे रुपये किलो असं आनंदाने हे तरुण मासे पकडताना ओरडत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अर्थातच सहज मासे हाती येण्याचा हा आनंद होता. ऑक्टोबर हिटमध्ये पावसाचा गारवा आणि त्यात सहज मिळणारे हे ताजे मासे, म्हणजे आनंदाचं कोठार रस्त्यावर सापडल्यासारखं होतं. काहींनी ५ किलोच्या वर मासे पकडले ते विकण्यासाठी. तर काही तरूणांनी आज गुरुवार असल्याने उद्या खाणार असं सांगितलं.