अलिबागमध्ये जेलीफिशमुळे मासेमारी ठप्प
नवगाव समुद्रकिनारी जवळपास 170 मच्छीमार बोटी गेल्या महिनाभर अशाच उभ्या आहेत. मासळी मिळत नसल्यानं मच्छीमारांकडे बोटी उभ्या ठेवण्यावाचून पर्यायच उरला नाही. त्यातच इथल्या मच्छीमारांना जेलीफीशच्या भीतीनं ग्रासलंय.
रायगड : नवगाव समुद्रकिनारी जवळपास 170 मच्छीमार बोटी गेल्या महिनाभर अशाच उभ्या आहेत. मासळी मिळत नसल्यानं मच्छीमारांकडे बोटी उभ्या ठेवण्यावाचून पर्यायच उरला नाही. त्यातच इथल्या मच्छीमारांना जेलीफीशच्या भीतीनं ग्रासलंय.
जेलीफीशला स्थानिक भाषेत बोंगलदिवे असं म्हणतात. अलीकडे इथल्या समुद्रात जेलीफीशचा वावर वाढलाय. त्यानं डंख केला तर दवाखान्यात जाण्याशिवाय पर्यायच नसतो यामुळे भीतीनं खलाशी बोटीवर जायला तयार नाहीत.
नवगावसह अलिबाग तालुक्यातील रेवस, थळ, साखर, अलिबाग, आक्षी, रेवदंडा इथल्या मच्छीमार बंदरांवर असाच शुकशुकाट पहायला मिळतोय. गेले महिनाभर काम नसल्यानं नवगावमधील तब्बल 800 हून अधिक परप्रांतीय खलाशी चक्क आपल्या गावी निघून गेलेत. यामुळे मासेमारीवर अवलंबून असलेले इतर व्यवसायही बंद आहेत.