दोन कारची स्पर्धा बेतली जीवावर, अपघातात ५ जण ठार
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-देवळाली-प्रवरा रस्त्यावर नरसाळी शिवारात काल मध्यरात्री तिन गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात ५ जण ठार झालेत. जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. कारची स्पर्धा लावण्यात आली होती, अशी माहिती मिळत आहे.
शिर्डी : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-देवळाली-प्रवरा रस्त्यावर नरसाळी शिवारात काल मध्यरात्री तिन गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात ५ जण ठार झालेत. जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. कारची स्पर्धा लावण्यात आली होती, अशी माहिती मिळत आहे.
एकाची प्रकृती चिंताजनक
स्विफ्ट कार , इंडिका कार आणि टँकर यांच्या भीषण अपघात झाला. स्विफ्ट कारमधील ५ जण ठार झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मित्राच्या वाढदिवसाचे जेवण करुन परतत असताना रात्री सव्वा बाराच्या दरम्यान हा अपघात झाला.
वाढदिवसानिमित्ताने जेवणाचा बेत
या अपघातात ठार झालेले सर्व जण श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर, भैरवनाथ नगर, ब्राम्हणगाव वेताळ येथील आहेत. ते २२ ते २५ वयोगटातील आहेत.मित्राचा वाढदिवस असल्याने दोन कारमधून अन्य मित्र जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. जेवण करुन परतत असताना मित्रांनी कार कोण पुढे नेतो, याची स्पर्धा लावली.
कारची दुसऱ्या कारला धडक
यावेळी समोरुन टॅंकर येत होता. त्यावेळी सुस्साट जाणाऱ्या स्विफ्टने आधी इंडिका कारला धडक दिली आणि त्यातच नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुधाच्या टँकरवर आदळली. या अपघातात ५ जणांचा दुर्दैवी अंत झाला.