एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव
एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
औरंगाबाद : एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
नगरसेवक पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी आयुक्त राज्य सरकारला प्रस्ताव सादर करणार आहेत.
कारवाईचे कारण काय ?
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कायद्या अंतर्गत महापौर नंदकुमार घोडेले यांनी आदेश दिलेत. हे पाच नगरसेवक नेहमीच महापालिका अधिका-यांना दमदाटी करायचे. तसेच योग्य भाषेत बोलत नव्हते याची तक्रार काही अधिका-यांनी केली होती. भाजपने सुद्धा हा मुद्दा लावून धरला होता. अखेर सर्वसाधारण सभेत महापौरांनी हा आदेश दिला.
कोणत्या नगरसेवकांचं पद धोक्यात आहे ?
फेरोज खान - विरोधीपक्ष नेता, एमआयएम
२) जमीर कादरी - नगरसेवक, एमआयएम
३) नासेर सिद्दीकी, गटनेता, एमआयएम
४) साजेदा फारुखी, नगरसेवीका, एमआयएम
५) सरबत बेगम, नगरसेवीका, एमआयएम यांचे नगरसेवकांचे रद्द करण्याची शिफारस.