रत्नागिरीच्या आरेवारे समुद्रात बुडून मुंबईच्या ५ जणांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे समुद्रात ५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे समुद्रात ५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलंय. आरेवारे समुद्र किनारी पर्यटकांची रविवार असल्यामुळे मोठ्याप्रमाणात गर्दी होती. याच किनाऱ्यावर बोरीवलीमधून एक ग्रुप आला होता. हे सगळे समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले यातील एका मुलीला स्थानिकांनी वाचवले तर ५ जणांचा यामध्ये बुडून मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे.